वास्तुशास्त्र आणि माझा अनुभव …
वास्तुशास्त्रात बऱ्याच गोष्टी निषिद्ध आहेत कोणत्या दिशेला कोणती वस्तू ठेवावी ह्याचे देखील मापदंड आहेत …
मला गेले काही महिने काहीतरी कोणाच्यातरी डोक्यात लागतंय असा भास होत होता .. बरेच प्रयत्न केला तरी तो भास येणं बंद होत नव्हतं…
असाच बोलता बोलता मी दीपिका बगरे हिच्याशी हा विषय बोललो दीपिका बगरे ही वास्तूआचार्य आहे ..
तिनी मला थोडा विचार करून विचारलं तुझ्या घराच्या ईशान्य दिशेला काय आहे , मी तिला कपाट आहे असं म्हणल्यावर त्या कपाटाच्या जवळपास काहीतरी अशी गोष्ट आहे म्हणाली की ज्यामुळे हा त्रास होतोय ..
शोधा शोध सुरू झाली ती म्हणाली होती हातोडी सारखं जड काहीतरी असण्याची शक्यता आहे आणि शोधताना मला अचानक पाईप रेंज कपाटाच्या वर सापडली तिला ते सांगितल्यावर तिनी तिथून तो पाईप रेंज हलवायला सांगितलं आणि अक्षरशः दुसऱ्या दिवसापासून ते मागचे ४-५ महिने होणारे भास संपूर्ण पणे संपले
धन्यवाद आचार्य दिपीका बगरे